22 November 2019

News Flash

पालघर : वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, दोन तासात एकही टक्का मतदान नाही

पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार

विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदाना सुरू असताना पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेने मतदानावर उत्स्फूर्त बहिष्कार घातला आहे. कोणत्याही गावामध्ये राजकीय पक्षाने एकही मतदान पोलिंग बूथ देखील लावलेले नाहीत किंवा पोलिंग एजंटही बसवले नाहीत. याउलट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर विरोधी भूमिका घेत या गावकऱ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन उस्फूर्तपणे मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

वाढवण बंदर उभे राहणार असलेल्या वाढवण वरोर गावात नागरिकांनी मतदानावर 100 टक्के बहिष्कार घातला आहे. आश्चर्य म्हणजे सकाळी 7 ते 9 या दोन तासात एक टक्काही मतदान झालेले नाही असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. येथील नागरिक घरातून बाहेरच पडलेले नाहीत. बहिष्कारावर येथील नागरिक ठाम असून सकाळच्या मतदानावरील बहिष्कार कायम राहण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ –

First Published on October 21, 2019 9:46 am

Web Title: vidhansabha election 2019 palghar boycott on voting sas 89
Just Now!
X