शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला पण पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पवारांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या सभेचा नक्की मतदानावर परिणाम होईल का?, राष्ट्रवादीला याचा किती फायदा होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा हा प्रश्न…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. देशभरातील अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवरुन पावसात उभ राहून भाषण देण्याच्या पवारांच्या या राजकारणावरील आणि आपल्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sharad pawars rally in rain help ncp scsg
First published on: 19-10-2019 at 17:04 IST