सोलापूर जिल्ह्यात हस्त नक्षत्राच्या पावसाने एकूणच पावसाळ्याची कसर भरून काढण्याचा प्रयत्न चालविला असताना या पावसामुळे जुन्या घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील दहा जण जखमी झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेतील जाधव कुटुंबीय शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. पावसामुळे जाधव यांच्या जुन्या घराची भिंत भिजली होती. परंतु पुन्हा पाऊस पडल्यामुळे ही भिंत घराच्या आतील बाजूस कोसळली. यात जाधव कुटुंबातील सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीसह दहाजण जखमी झाले. सर्वाना तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2015 रोजी प्रकाशित
सोलापूरजवळ घराची भिंत कोसळून १० जखमी
जाधव कुटुंबातील सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीसह दहाजण जखमी
Written by अपर्णा देगावकर

First published on: 06-10-2015 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 injured due to house wall collapsed near solapur