वसई : कॅनडामध्ये झालेल्या विमान अपघातात वसईत राहणार्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अभय गडरू असे त्याचे नाव आहे. अभय वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी कॅनडाला गेला होता. या अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान झाडावर कोसळल्याने हा अपघात झाला. दोन इंजिन असलेले कमी वजनाचे विमान पायपर पीए-३४ सेनेका, ब्रिटिश कोलंबियाच्या चेविवैक शहरामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोन भारतीयांसह तीन प्रक्षिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अभय गडरु (२५) आणि यश विजय रामुगडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांची नावे आहेत.
अभय गडरू (२५) हा वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील सेक्टर ६ मधील कृष्णवंदन इमारतीत आई वडील आणि लहान भावासह रहात होता. एप्रिल २०२१ मध्ये तो कॅनडा मध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्याला लहान भाऊ चिराह हा देखील व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करण्यासाठी गेला होता. शनिवारी पहाटे कॅनडाच्या वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.
हेही वाचा : निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक; म्हणाले, “सोडून जायचं होतं तर…”
आम्हाला ही घटना समजल्यावर प्रचंड धक्का बसला आहे. त्याचा भाऊ चिराग हा कॅनडाला असून मृतदेह ताब्यात घेण्याची पुढील प्रक्रिया पार पडत आहे, अशी माहिती मयत अभयचा मित्र गौरव गोयल याने दिली. अभयचे वडील अनिल आणि आई भवानी हे धार्मिक यात्रेसाठी उत्तेराला गेले होते. सध्या ते दिल्ली येथे आहे असे त्यांनी सांगितले. गडरू कुटुंबिय मुळचे काश्मीरचे आहे. अभयचे शिक्षण मुंबईच्या कांदिवली येथील महाविद्यालयातून झाले होते. अभयला सुरवातीपासूनच वैमानिक बनण्याचे स्वप्न होते. पण त्याचा दुर्देवी अंत झाला अशी माहिती त्याच्या मित्राने दिली.