सांगली: ध्वनीवर्धक व ढोल-ताशांच्या दणदणाटात तब्बल २९ तासानंतर मिरजेतील विसर्जन मिरवणुक शुक्रवारी दुपारी दोन वाजता पार पडली. ध्वनीमर्यादेचे उंघन करीत सुरू असलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र अविरत टिकून होता. मात्र, मिरवणुक पाहण्यासाठी आलेले भाविकांनी पावसाची उसंत मिळत नसल्याचे पाहून घरी परतणेच पसंत केले.

मिरज शहरात गुरूवारी सकाळी नऊ वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. १७१ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्ती या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे सकाळी दहा वाजता गणेश तलावात विसर्जन झाल्यानंतर दोन तासाच्या खंडानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यातील गणेशाचे विसर्जन करण्यात आले. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. ध्वनीवर्धकाबरोबरच ढोलताशांच्या तालात निघालेल्या मिरवणुकीत उप अधिक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीवकुमार झाडे आदीसह अधिकारी, महिला व पुरूष कर्मचारी विशेष पोषाखात सहभागी झाले होते.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

आणखी वाचा-मिरजेत विसर्जन मिरवणुकीत अज्ञाताचा संशयास्पद मृत्यू

विसर्जन मिरवणुक मार्गावर शुभेच्छा देण्यासाठी विश्‍वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा महासंघ, शिवसेना शिंदे व ठाकरे गट, भाजप, जनसुराज्य शक्ती व महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वागत कमानी मिरवनुक मार्गावर उभारल्या होत्या. पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे विधानसभा प्रचार प्रमुख मोहन वनखंडे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे बाळासाहेब वनमोरे आदींनी मिरवणुकीत उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तर महापालिकेनेही लक्ष्मी मार्केट परिसरात स्वागत कक्ष उभारला होता. या ठिकाणी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, तहसिलदार अर्चना पाटील आदींनी उपस्थित राहून मंडळांना शुभेच्छा दिल्या.

मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ध्वनी मर्यादेचे उंघन करीत ध्वनी वर्धकांच्या भिंती आणि लेसर विद्युत रोषणाईवरच भर दिला होता. आवाजामुळे अनेक पोलीस कर्मचारी व भाविकही कानात कापसाचे बोळे घालूनच सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते.

आणखी वाचा-वर्षा बंगल्यावरच्या कृत्रिम हौदात उतरुन श्रीकांत शिंदेंनी दिला लाडक्या गणरायला निरोप, मुख्यमंत्री म्हणाले…

अज्ञाताचा संशयास्पद मृत्यू

विसर्जन मिरवणुक मार्गावर एका अज्ञाताचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. मृत्यूचे नेमके कारण कळालेले नसले तरी ह्दयविकाराच्या धयययाने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अज्ञाताची ओळख पटविण्याचे काम पोलीसांनी सुरू केले असून अद्याप काहीच माहिती उपलब्ध झालेली नाही.