आषाढी वारीच्या फेऱ्यांमधून एस. टी.ला ४९ लाख उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी. बसने प्रवास केला. यातून बीड विभागाला ४९ लाख उत्पन्न मिळाले.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी. बसने प्रवास केला. यातून बीड विभागाला ४९ लाख उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत ३ लाखांनी उत्पन्न वाढले.
बीड जिल्ह्यातून पंढरपूरला आषाढीनिमित्त जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. विविध िदडय़ांच्या माध्यमातून जाणारे वारकरीही मोठय़ा प्रमाणात आहेत. विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गरसोय होऊ नये, या साठी बीड विभागातील आठ आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था केली होती. प्रत्येक आगारातून दिवसभर बसेस सोडण्यात आल्या. २३ जुल ते १ ऑगस्ट दरम्यान १५२ बसेस धावत होत्या.
विभागातील आगारांत भाविकांची गरसोय होऊ नये, या साठी ठराविक पॉईंट ठरविले होते. बीड बसस्थानकात ८ दिवस मंडप उभारून एस. टी.च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पंढरपूरला जाण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्रवासी, भाविकांची कोणतीही गरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. १५२ बसेसनी नऊ दिवसांत ८४० फेऱ्या केल्या. यामध्ये १ लाख ९० हजार किलोमीटर एस. टी.ची चाके फिरली. बीड विभागाला यातून ४९ लाख उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच कालावधीत ४६ लाख उत्पन्न मिळाले होते. १ लाख ८० हजार किलोमीटर प्रवास झाला होता.
या वर्षी उत्पन्नामध्ये ३ लाखांनी, तर किलोमीटरमध्ये दहा हजाराने वाढ झाली आहे. विभाग नियंत्रक पी. बी. नाईक, विभागीय वाहतूक अधिकारी यू. बी. वावरे यांनी प्रवासी भाविकांची गरसोय होणार नाही, या साठी आगारप्रमुखांना योग्य सूचना देऊन बसस्थानकाच्या ठिकाणी भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यास सांगितले होते. यात्रा कालावधीत कोणत्याही बसेसमध्ये बिघाड होऊ नये, या साठी यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 49 lakhs profit to st in ashadhi wari

Next Story
तपासणी सुरू झाल्यामुळे वसतिगृहांचा कायापालट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी