Viral video: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. यावेळी खेळता खेळता एक बाळ चक्क गरम पादार्थामध्ये पडतं. हा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कधी कधी पालकांचाही हलगर्जीपणा कारणीभूत ठरतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही सेकंदांसाठी तुमच्याही काळजात धस्स होईल. दोन व्यक्ती आपाआपसात बोलत आहेत आणि यावेळी लहान बाळाला सरकत्या पाळण्यामध्ये बसवलं आहे. यावेळी हे दोन व्यक्ती बोलण्यात व्यस्थ असताना अचानक बाळ सरकत सरकत गरम पाण्याकडे जातं अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा.

Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पालकांचा हलगर्जीपणा या संपूर्ण घटनत कारणीभूत ठरला आहे. त्याठिकाणी दोन दोन व्यक्ती उपस्थित असतानाही त्यांना बाळाच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. दोन व्यक्ती बोलण्यात व्यस्थ असताना अचानक बाळ सरकत सरकत गरम पाण्याकडे जातं आणि गरम पाण्याच्या भांड्यात पडतं. या बाळाचं अर्ध शरीर गरम पाण्यात तर अर्ध बाहेर असल्याचं दिसत आहे. यावेळी आवाज होताच हे दोघे बाळाला पकडण्यासाठी येतात मात्र तोपर्यंत बाळ पडलेलं असतं. यानंतर दोघही बाळाला बाहेर काढतात आणि घेऊन जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर change_your_mindset7 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.