हिंगोलीजवळील िलबाळा मक्ता परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये महाबीजतर्फे ४ कोटी रुपये खर्चाचा बीज प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये ६० हजार क्विंटल बियाणांवर प्रक्रिया होऊ शकेल. परिणामी शेतकऱ्यांची बियाणे टंचाईतून सुटका होईल.
िहगोलीच्या रेल्वेस्थानक परिसरात महाबीजतर्फे बीज प्रक्रिया केंद्र सुरू आहे. महाबीजमार्फत वितरीत केलेल्या बियाणांची काढणी झाल्यानंतर ते महाबीजकडे दिले जाते. त्यावर प्रक्रिया करून बियाणे होते. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन व गहू पिकाचा समावेश आहे. सोयाबीन हंगामात महाबीजच्या सध्याच्या जागेवर सोयाबीनसाठी जागाही शिल्लक राहत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी उद्योजकाकडून बियाणे प्रक्रिया करून येथे बियाणांची साठवणूक केली जाते. िहगोलीत सध्या कार्यान्वित असलेल्या महाबीजच्या प्रक्रिया केंद्राची क्षमता सुमारे ३० हजार क्विंटल आहे.
बियाणे तयार झाल्यानंतर ते पोत्यात भरून टॅिगग करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बियाणे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध राहत नाही. तर ती उपलब्ध असलेल्या गोदामाच्या छताला ठिकठिकाणी छिद्र पडले असून उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात हवा देखील खेळती राहत नाही, त्यामुळे या ठिकाणी ठेवलेल्या बियाणांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे नवीन केंद्र ५ एकर जागेवर उभारले जाणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर ३० हजार क्विंटल बियाणे अधिक होईल. त्यासाठी गोदामही बांधले जाणार आहे. या प्रकल्प उभारणीची पाहणी करण्यासाठी महाबीजचे वरिष्ठ अधिकारी अरुण उन्हाळे यांनी नुकतीच भेट दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2015 रोजी प्रकाशित
िहगोलीत होणार महाबीजचे केंद्र ६० हजार क्विंटल बियाणांवर होणार प्रक्रिया!
हिंगोलीजवळील िलबाळा मक्ता परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये महाबीजतर्फे ४ कोटी रुपये खर्चाचा बीज प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये ६० हजार क्विंटल बियाणांवर प्रक्रिया होऊ शकेल. परिणामी शेतकऱ्यांची बियाणे टंचाईतून सुटका होईल.िहगोलीच्या रेल्वेस्थानक परिसरात महाबीजतर्फे बीज प्रक्रिया केंद्र सुरू …
First published on: 26-01-2015 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 thousand quental seeds process project