रत्नागिरीतील मिऱ्या नागपूर महामार्गावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार २५ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्तेश्वर सहदेव ठीक (वय ५८, रा. प्रशांतनगर रत्नागिरी) व राघो कृष्णा धुरी (वय ६७, रा. साईनगर रत्नागिरी) अशी दोघांची नावे आहेत.

हेही वाचा – सोलापुरात आठ जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाचा – आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर दिवस-रात्र चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सर्वच भागातील रस्ते एकाच वेळी खोदल्याने रस्त्यावरील प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मार्गावर वांरवार अपघात होण्याचे प्रमाण वाढतच आहे. रत्नागिरीतील एका खाजगी व्यवसायिकाचा डंपरने (क्रमांक एमएच ०८ एच २२९९) खोदलेल्या रस्त्यावर दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक राघो धुरी यांच्या डोक्यावरून डंपरचा टायर गेल्याने डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. तर मागे बसलेल्या मुक्तेश्वर ठीक यांच्याही डोक्याला जबर मार लागला. यात दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहचून पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून दोघांचेही मृतदेह रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. डंपर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.