धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

सेवानिवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असतानाच जीवन संपवले

सेवानिवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असतानाच धुळ्यातील एका पोलीस निरीक्षकाने गोळी झाडून आत्महत्या केली. रमेशसिंग परदेशी असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

सेवानिवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असतानाच धुळ्यातील एका पोलीस निरीक्षकाने गोळी झाडून आत्महत्या केली. रमेशसिंग परदेशी असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्व्हिस रिव्हॉलवरने स्वत:वर गोळी झाडली. ही घटना बुधवारी रात्री घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

धुळे शहरातील धाडसी अधिकारी म्हणून परदेशी यांची ओळख होती. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे ४ महिने शिल्लक राहिले होते. मात्र, बुधवारी रात्री त्यांनी अचानक आपल्या राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्या शेख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A police inspector in dhule allegedly committed suicide by shooting himself with his pistol