सांगली : नवा जीव पहिला श्वास घेण्यास आसुसलेला, गर्भवती असह्य प्रसव वेदनांच्या गर्तेत अडलेली, पण रानवस्तीवरील शेजाऱ्यांनी वाट अडवलेली. महसूलच्या अधिकाऱ्यांसह गावच्या जाणत्यांनी प्रयत्न करुनही वाट मिळालीच नाही. अडलेल्या महिलेला आडवाटेने झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत पोहच करत कसाबसा मिरजेचा दवाखाना गाठला. हा प्रसंग घडला तो आरग (ता.मिरज) येथे मंगळवारी दुपारी.

एरवी आदिवासी पाड्यांत किंवा डोंगरदऱ्यांत नेहमी पहायला मिळणारे हे वेदनादायी चित्र प्रगत समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात मंगळवारी अनुभवण्याची वेळ आली. मिरज तालुक्यातील आरग गावात सुमारे चार तास ही गर्भवती जन्म-मृत्यूशी संघर्ष करत होती. पण हातापायाने धड असणारी माणसे माणूसकी हरवल्याच्या भावनेने दगडासारखी घट्ट झाली होती. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील माळी मळ्यातील महिलेच्या प्रसुतीसाठी डॉक्टरांनी या आठवड्यातील तारीख दिली होती. मात्र कुटुंबियांना तिच्या प्रसूतीपेक्षा रस्ता कसा मिळणार? याचीच चिंता लागून राहिली होती. आज गर्भवतीला वेदना होऊ लागल्याने कुटुंबियांना १०८ रुग्णवाहिकेला हाक दिली. ती धावत आली देखील, पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तिच्या कुटुंबियांनी संबंधित शेतकऱ्याशी फोनवर संपर्क करुन रुग्णवाहिकेसाठी रस्त्यासाठी विनंती केली, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य यांनीही धाव घेतली. संबंधित शेतकऱ्याला फोनवर फोन केले. गर्भवतीसाठी आणि रुग्णवाहिकेसाठी रस्त्यासाठी साद घातली. पण माणुसकीचा पाझर फुटला नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले पण आडलेली महिला मोकळी होण्यासाठी वाट अडलेलीच राहिली.

Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला
Woman Gets Trapped After Grain Sacks Fall On Her, Then This Happened Viral Video
झाडू मारणाऱ्या महिलेच्या अंगावर अचानक पडली धान्यांची पोती, कामगारांनी वाचला जीव; थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा – भाजपकडून ४०० जागा जिंकण्याचा निर्धार; शरद पवारांची खोचक टीका, म्हणाले, “त्यांनी सर्वच जागा..”

हेही वाचा – ‘बालभारती’चे समृद्ध ग्रंथालय आता सर्वसामान्यांसाठीही खुले, दुर्मीळ पुस्तके, ग्रंथांचे वाचन शक्य

तोपर्यंत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गर्भवतीला झोळीत घातले. काट्याकुट्यातून, ओढ्या ओघळीतून आणि बांधाबांधांवरुन रुग्णवाहिकेकडे आणण्याचा प्रयत्न केला. आडवे आलेले गेट उघडले. शेतकऱ्याने घातलेला बांधही तात्पुरता दूर केला. कसे बसे रुग्णवाहिकेत घातले. वेळ साधण्यासाठी रुग्णवाहिका सुसाट वेगाने मिरजेकडे निघाली. नवा जिवाचं आगमन मात्र उद्यापर्यंत प्रतिक्षेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.