रायगडमध्ये आज मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त्यावर अक्षरश मासे तरंगत असल्याने लोकांची एकच गर्दी झाली होती. झालं असं की, खालापूर येथील तलावातून मासे भरुन टेम्पो मुंबईकडे जात असताना जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघात झाला. अपघातानंतर माशांनी भरलेले सर्व ड्रम खाली रस्त्यावर पडले आणि सोबत मासेही रस्यावर परसले. हे सर्व मासे मंगरुळ जातीचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्यावर माशांचा खच झाल्याने लोकांची एकच गर्दी झाली होती. माशांसोबत ड्रममधील पाणीही रस्त्यावर साचल्याने मासे त्यात तरंगत होते. हे मासे पकडण्यासाठी लोकांनी तसंच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tempo with fish overturn on mumbai pune national highway in raigad sgy
First published on: 10-12-2019 at 17:07 IST