२०१९ च्या विधासनसभा निवडणुकीवेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड ‘मातोश्री’त चर्चा झाली. या चर्चेत अमित शाहांबरोबर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेनेकडून ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) करण्यात येतो. मात्र, भाजपाने तो दावा अनेकदा फेटाळला आहे.

उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातही याचा उल्लेख करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. “शिवसेना आणि भाजपामध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. अडीच वर्ष भाजपा-अडीच वर्ष शिवसेना हे तेव्हाच सांगत होतो. आत्ता केलं, तेव्हा का नाही?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला होता. हाच मुद्दा धरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

“भाजपा अडीच आणि शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती करण्यावर सहमती झालेली. मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे,” असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा : मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी, अंबादास दानवे आक्रमक; म्हणाले “सत्ताधारी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेनेचा लोकशाहीवर विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केली. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ वर आमचा विश्वास आहे. पण, एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे गेला,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केला. ते ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.