Aaditya Thackeray on Kashmir Conflict : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अनेकवेळा उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या बैठकांमधून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. पण या अत्यंत अवघड काळात त्यांनी भारतीयांशी थेट संवाद केला नव्हता. पंरतु, आता ते आज ८ वाजता जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आमदार आदित्य ठाकरे यांचं ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “मला आशा आहे की आज भारत सरकार जगाला हे स्पष्ट करेल की काश्मीर कोणत्याही चर्चेचा भाग नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही, अगदी द्विपक्षीय मुद्दाही नाही. पीओकेचा भाग हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तो प्रदेश भारताचा आहे आणि तो भारताला परत करावा लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बातमी अपडेट होत आहे