शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती. यानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अनेक राजकीय मंडळी, शिवसैनिक, कार्यकर्ते त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेकजण सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत भावना व्यक्त करताना दिसत आहे. नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही तासांपूर्वी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केला आहे. यात आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे हे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तर त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नातवाच्या पाठी उभे असल्याचे दिसत आहे.

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

आदित्य ठाकरे यांनी हा खास फोटो शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या त्यांच्या या फोटोची प्रचंड चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक शिवसैनिक नतमस्तक होताना दिसत आहे.

Photos: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५० हजार दिव्यांपासून साकारले पोर्ट्रेट

दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांबाबत ते महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे. यात ते नेमकं काय बोलतात, शिवसैनिकांना काय आदेश देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.