* महाराष्ट्र आणि पंजाबमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची मदत * सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथून अपहरण

कळवण : सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथून अपहरण झालेली १२ वर्षांची आदिवासी मुलगी सुमारे दीड महिन्यानंतर पंजाबमधून सुखरुपपणे आपल्या घरी पोहोचली आहे. तिच्या सुटकेसाठी स्थानिक तसेच महाराष्ट्र आणि पंजाबमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मदत के ली. उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे चार एप्रिल रोजी अपहरण झाले होते.

सोनालीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व माहिती दिली.

एप्रिल महिन्यात करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आणि सर्वत्र कडक निर्बंध असल्याने सोनालीला घेण्यासाठी सुरगाणा तालुक्यातून अमृतसर येथे जाणे सहजशक्य नसल्याने गांगुर्डे यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांना मदतीचे आवाहन केल ेहोते.

पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीला घेण्यासाठी केशरीनाथ पाटील आणि मोहन गांगुर्डे यांनी पंजाबकडे प्रस्थान केले.

यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी अमृतसर येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत त्यांना सर्व माहिती सांगितली होती.

अमृतसरला पोहचल्यानंतर  पंजाब शिवसेना राज्यप्रमुख आणि युवासेना प्रमुख संजीव भास्कर तसेच इतरांनी त्यांना मदत केली. अखेर विमानाने सोनालीला मुंबईला आणण्यात आले. आणि १४ मे  रोजी सोनाली आपल्या घरी सुखरुप पोहोचली.

एका मालमोटारीतून तिला नेण्यात येत होते. त्या मालमोटारीत अजून १५ मुले होती, असे ती सांगते. परंतु, ही मालमोटार कु ठली होती, हे तिला सांगता येत नाही. मालमोटार अमृतसर परिसरात थांबली असतांना सोनाली मालमोटारीतून उडी मारून पळाली. एका महिलेने विचारपूस के ल्यावर तिने सर्व माहिती सांगितली. संबंधित महिलेले सोनालीच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

सोनालीला अनेक अडचणींना तोंड देत घरी पोहचविले. त्यावेळी तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद बघून झालेला त्रासही कमी झाला.

-के शरीनाथ पाटील (शिवसेना सहसंपर्क प्रमुख, कळवण)

आदवासी भागात अशा अनेक घटना घडत असतात. मात्र याकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. मला या घटनेची माहिती मिळाल्यावर ती के शरीनाथ पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी के लेल्या प्रयत्नांमुळेच सोनालीला घरी आणणे शक्य झाले.

-मोहन गांगुर्डे (शिवसेना तालुकाप्रमुख, सुरगाणा)