अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. बाबुर्डी बेंद परिसरात हा महादेव वस्तीजवळ हा अपघात झाला. मृतांपैकी तीन जण भिंगार आणि एक जण वाळकी येथील आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना हा अपघात घडला. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ भरधाव आलेली कार पाठीमागून ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तीन जण जागीच ठार झाल्याने भिंगार गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.