अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा अपघात झाला. अपघातामूळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. त्यामुळे तब्बल ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या अपघातात दोन्ही ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लोखंडी गज (बार) घेऊन ही ट्रक जात होती. मात्र, दरम्यान नागपूर-औरंगाबाद महामार्गावर रस्त्यावरी खड्डा चुकवताना हा अपघात झाला. अपघातामुळे ट्रकमधील लोखंडी सळई ट्रकमधील प्रवाशांच्या शरीरात आरपार घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर चालकाच्या शरीरात लोखंडी गज शिरून त्याचा मृतदेह केबिनची काच तोडून बाहेर आल्याचं दिसलं.