काही वर्षांपूर्वी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. मात्र, या पेंग्विनचे मुंबईत आगमन झाल्यानंतर विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असेलल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. पण आता मुंबईतील वीर जिजामाता भोसले उद्यानात पेंग्विन आणि इतर प्राणी बघण्यासाठी होत असलेली गर्दी बघून आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ‘नोटांवर लक्ष्मी-गणपतीचा फोटो लावा’ अरविंद केजरीवालांच्या मागणीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्र आणि केजरीवाल मिळून…”

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“मुंबईत महापालिकेंतर्गत आम्ही वीर जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्राहलयाचे जे काम केले आहे, त्याचा आज अभिमान वाटतो आहे. या प्राणीसंग्रहालयातील प्राणीही मुंबईच्या महसूलात हातभार लावत असल्याचा आनंद आहे. नागरीक विशेषत: पेंग्विन बघण्यासाठी गर्दी करत असून त्याद्वारेही मुंबईच्या महसूलात प्रचंड वाढ होत असल्याचे” आदित्य ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंगळवारी वीर जिजामाता उद्यानातील प्राणी बघण्यासाठी २५ हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. याद्वारे एकाच दिवशी ९ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झाले होते.