आमदारांनंतर आता खासदारांनीही बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. ”जे नेते आतापर्यंत सांगायचे की त्यांच्या मनात आमच्या बद्दल आदर आहे, ते सर्व खोटं होतं. आता त्यांचा मनातला राग आता दिसू लागला आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच १२ खासदार शिंदे गटात जाणार याची कल्पना होती. हे सर्व गद्दार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “….तेव्हा मी पुढच्या सीटवर बसायचो हे लक्षात ठेवा,” रामदास कदमांनी राणेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना करुन दिली आठवण, २२ मोठी विधानं

काय म्हणाले आदित्य ठाकरे

मुंबईतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. ”जे नेते आतापर्यंत सांगायचे की त्यांच्या मनात आमच्या बद्दल आदर आहे. ते सर्व खोटं होतं. आता त्यांचा मनातला राग आता दिसू लागला आहे. ही आता सर्कस सुरू आहे. उद्यापासून एक महत्त्वाची केस सुरू होत आहे. ही केस शिवसेनेसाठीच नव्हे तर देशासाठी महत्त्वाची असेल. या देशात लोकशाही आहे की नाही, याचा निकाल लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – “…म्हणून १२ खासदार शिंदे गटात सामील झाले” खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या युतीच्या दाव्याबाबतही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणी काय बोलायचं, हा ज्याचा त्याचा विषय आहे. त्यावर मी बोलणार नाही. एक एक बाण जात असले तरी, धनुष्य चालवण्यासाठी लागणारी ताकद आणि हिंमत ही फक्त ठाकरेंकडे आहे. माझे सर्व बंडखोरांना एवढेच आव्हान आहे की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, निवडणूक लढावी, जिंकलात तर विजय तुमचा”, असेही ते म्हणाले.