आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला अथवा घर सोडून गेला, तर कुटुंबीय कासावीस होतात. त्याची तक्रार पोलीस स्थानकात देत वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झालं नाही तर, शोधून देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केले जाते. पण, हे सगळं एखाद्या पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर?, अशीच काही घटना सोलापूर शहरात घडली आहे. त्याची सोशल मीडियावर जोमात चर्चा सुरू आहे.

सोलापुरातील बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील एक मांजर ( मन्या ) तीन दिवसांपासून गायब होते. भिंतीवर पोस्टर चिकटवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केल्याच्या तीन दिवसानंतर मांजराचा शोध लागला. बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील मांजर म्हणजेच मन्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मांजराच्या पोटावर जखम झाली होती. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्या मांजराला मोठी जखम झाली होती. जखमेला टाके घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

हेही वाचा – “नाना पटोले, आदित्य ठाकरेंनी १०६ हुतात्म्यांची…”, आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “अजित पवारांनी दारू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यासाठी मांजराला भुलीचे इंजेक्शन टोचले. तेव्हा निपचित पडलेले मांजर उठले आणि नखे ओरबाडत पळून गेले. मांजर पळून गेल्यानंतर बासूतकर कुटुंबीय अधिक काळजीत पडले. मांजर पळून गेल्याच्या रात्रीपासून त्याची शोधमोहिम सुरु झाली. तीन दिवस शोधूनही मांजराचा शोध लागला नाही. अखेर मांजर पळून गेलेल्या परिसरात पॉम्प्लेट चिकवण्यात आले. सोशल मीडियाचाही त्यासाठी वापर करण्यात आला. अखेर चौथ्या दिवशी कृष्णा कॉलनी सोसायटीत ते मांजर सापडले. त्यामुळे बासूतकर कुटुंबीयांच्या जिवात जीव आला.