‘प्री वेडिंग’साठी गोव्यात जाऊन रात्रभर सोबत राहिल्यानंतर वराने लग्न मोडले; कारण ऐकून थक्क व्हाल!

रात्री गोव्याच्या हॉटेलात एकाच खोलीत राहिल्यानंतर सकाळी होणाऱ्या नवऱ्याने “तू मला हवी तशी नाहीस”, म्हणत लग्नच मोडलं!

pre wedding photo shoot p
प्रि वेडिंग फोटोशूटनंतर रात्री गोव्यात एकत्र राहिले अन्…

Pre wedding photoshoot Buldhana News : लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची नवी प्रथा सध्या रूढ होऊ लागली आहे. लग्नाच्या आधी होणारे नवरा-नवरी फोटोशूट करून घेतात. पण अशाच एका फोटोशूटमुळे बुलढाण्यातील एक युवती संकटात सापडली आहे. लग्न ठरलेल्या युवक व युवतीने गोवा येथे ‘प्री वेडिंग’ केल्यानंतर ते हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहिले. पण सकाळी नियोजित वराने ‘मला जशी मुलगी हवी, तशी तू नाहीस’ असे कारण सांगून लग्न मोडत असल्याचे तरुणीला सांगितले. या प्रकारामुळे तरूणीसह तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं घडलं काय?

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एक गावातल्या २० वर्षीय तरुणीचे तालुक्यातीलच २५ वर्षीय अभियंता तरुणाशी लग्न ठरले होते. दोघांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला. तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संभाषण सुरू होते. एप्रिल महिन्यात तरुण-तरुणी, तिची एक मैत्रीण आणि एक छायाचित्रकार हे कारने गोव्याला ‘प्री वेडिंग’ शूट साठी गेले होते.

‘प्री वेडिंग’ शूट केल्यानंतर रात्री त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. तरुण-तरुणी रात्री एकाच खोलीत थांबले होते. पण सकाळी उठल्यावर तरुणाने गोंधळ घालून ‘मला जशी मुलगी हवी होती, तशी तू नाही’ असं तरुणीला सांगितलं. यावेळी तरुणाने कपडे फाडून मोबाईल देखील फोडला. या प्रकारामुळे तरुणी घाबरली. घरी आल्यावर तिने आई-वडिलांना घडलेला सविस्तर प्रकार सांगितला.

चर्चा करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू!

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे अधिक गंभीर समस्या उद्भवण्याच्या विचाराने कुटुंबीयांनी तक्रार देण्याचे टाळून आपापसात सामाजिक स्तरावर प्रकरणाचा निपटारा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After pre wedding photoshoot in goa night stay groom rejects to marry girl pmw

Next Story
“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी