पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबीयांच्या कारला अपघात झाल्याने सुनेसह १० जण जखमी झाले आहेत. कारमध्ये सर्व महिलाच होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आष्टा येथे तवेरा कारमधून जात होते. सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर इस्लामपूरच्या राजारामबापू रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर हा जिल्हापरिषद निवडणुकीसाठी उभा आहे. त्याच्या प्रचारासाठी या महिला तवेरा या कारमधून निघाल्या होत्या. इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर कोणीतरी अचानक आडवे आल्याने चालकाने ब्रेक दाबला. त्यामुळे ही कार उलटली. कारमध्ये खोत यांच्या सुनेसह प्रचारासाठी आलेल्या महिला व चालक जखमी झाले. जखमींना त्वरीत उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले.