राहाता: स्वतःला संत म्हणवून घेणारा युवराज उर्फ तलवार बाबा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या व्यक्तीने साईबाबा यांच्याबद्दल बदनामीकारक तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी चित्रफीत तयार करून समाज माध्यमावर प्रसारित केली, त्यामुळे साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः शिर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

या संतापजनक प्रकाराची माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी गाडीलकर यांच्या निदर्शनास आणून देताच, गांभीर्य लक्षात घेऊन गाडीलकर यांनी स्वतःच फिर्याद दाखल केली. श्रीसाईबाबांची बदनामी करणाऱ्या या घटनेमुळे साईभक्तांमध्ये संतापाचे वातावरण असून, बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. युवराज उर्फ तलवार बाबाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी भाविक करत आहेत.

साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची बदनामी करणारे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे साई संस्थानने स्पष्ट केले आहे. यामुळे धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सनदशीर मार्गाने धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माफी मागितली

साईभक्त व नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तथाकथित संत युवराज महाराज यांनी माफी मागितली आहे. देशभरातून २००० फोन कॉल केले गेले. विविध ठिकाणी पोलीस केस दाखल करण्यात आल्याचा हा परिणाम आहे.- कमलाकर कोते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)