मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील सरकारी रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणावरून मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘तिखट’ प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता परसली आहे.

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

हेही वाचा : “…अन् हे मोदी सरकारचे ‘खायचे दात’ आहेत”, ‘त्या’ निर्णयावरून ठाकरे गटाचं टीकास्र

अशात ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी मंत्र्यांच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे’ असा थेट सवाल विचारला. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूळ विषयाला बगल दिली. त्यामुळे या विषयावर शिंदे आणि पवार यांच्यात पुढे संवाद झाला नाही.

हेही वाचा : “लोकसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आम्ही प्रचार करू, पण…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवारांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.