सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे नेतृत्व करत आहेत. मात्र अजूनही त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्यात सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जनतेच्या या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यामुळे सध्याच्या समस्या सोडवण्यास अडचणी येत आहेत. याच अडचणींकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे. १६५ आमदारांचा पाठिंबा मिळालेला असूनही सरकार मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी का घाबरत आहे? असा सवाल केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >> “…यातच त्यांचा वेळ जातोय”, जयंत पाटलांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टोला!

narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”

“आपत्ती व्यवस्थापन विभागाला संचालक नेमला जातो. पण अद्याप तो नेमलेला नाही. आपल्याकडे अनेकदा महापूर येतो. पडझड होते. घरं पडतात. तसेच ढगफुटी होऊन तलाव फुटतात. त्यामुळे मदत व पुनर्वसन खात्याला पूर्णवेळ सचिव असणे गरजेचे असते. मात्र अजूनतरी पूर्णवेळ सचिव यांना देता आला नाही. हे त्यांचे अपयश आहे. दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. त्यांना कोणालाही विचारायचं नाही. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतले पाहिजेत. पण ते निर्णय घेताना दिसत नाहीयेत,” अशी टीका अजित पवार यांनी केली.

हेही वाचा >> “लढाईसाठी तयार राहा”, उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी, जिल्हा प्रमुखांना आदेश; म्हणाले “कोण गेले याचा…”

तसेच, “मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा, हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री नेमले गेले, तर काम लवकर होते. सचिवांना, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. बैठका सुरु होतात, आढावा घेता येतो. या माध्यमातून अडचणी दूर करता येतात. सध्या सगळा भार या दोघांच्याच खांद्यावर आहे. यामागचे गमक काय? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील. १६५ आमदारांचं पाठबळ विश्वासदर्शक ठरावात मिळाले असताना, मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी ते का घाबरत आहेत? त्यांना कोणी थांबवलं आहे? घोडं कोठे पेंड खात आहे?” असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा >> President Election: नवनीत राणा म्हणतात, “आम्ही शरद पवारांना मानणारे लोक…”; हात जोडून केली ‘ही’ विनंती

“राज्यात जेव्हा संकट येते तेव्हा पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जातात. त्यांनी तिथे थांबले पाहिजे. त्यांनी कलेक्टर, एसपी, सीईओ यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. बऱ्याच जागा खाली आहेत. त्या ताबडतोब भरून राज्याचा कारभार गतीने होण्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची ती गरज आहे,” असे म्हणत त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराची गरज सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.