scorecardresearch

Premium

महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवारांचा राज्य सरकारला टोला

मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली.

ajit pawar
अजित पवार (संग्रहित फोटो)

मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावलाय. ते वर्धा जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचे ‘ते’ ट्वीट म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी”; अमोल मिटकरींची टीका

Chandrakant Khaire
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
Supriya Sule criticizes BJP
सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”
Maharashtra, heavy rain predictions, doppler radar, meteorological department
नागपूर बुडाले, शेतीचे नुकसान नेहमीचेच, तरी ‘दिव्याखाली अंधार’ कसा?
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

“उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या काय आहेत? काय अडचणी आहेत हे कसे समणार. अजूनही काही भागात पाऊस सुरु आहे. पंचनामे करताना घराची फक्त भिंत ओली झाली असून घर तर तसेच आहे, असे म्हटले जात आहे. पण भिंती सुकल्यानंतर भेगा पडून घर पडू शकते. आम्ही प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिलं,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> अर्जुन खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला? दिल्लीत श्रीकांत शिंदेंची भेट; म्हणाले “पुढील दोन दिवसात…”

“काही भागात गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. काही काम सामाजिक संस्थांनी करावे, काही काम सीएसआरमधून करावे. आम्ही सर्व जाबाबदारी राज्य सरकारवर ढकलणार नाही. आम्हीदेखील बराच काळ सरकारमध्ये काम केलेले आहे,” अजे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पंचनामे सुरु आहेत. लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राज्य सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे फडणवीस गुरुवारी (२८ जुलै) म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar criticizes state government over crop damage due to heavy rain and help to farmers prd

First published on: 29-07-2022 at 13:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×