मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्याचा मोठा निकाल दिला. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहा,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते शुक्रवारी (२३ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “बीएमसीमधील जागा एकनाथ शिंदे गटाला देण्यात आली होती. तेव्हाच मी म्हटलं होतं की आता शिवाजी पार्कची जागा ठाकरे गटाला द्यावी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. ही परंपरा शिवसैनिकांना हवी आहे. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत.”

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
suspense continues over vijay wadettiwar and mla pratibha dhanorkar for lok sabha candidate for chandrapur
विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? सस्पेन्स कायम; तेली समाजापाठोपाठ कुणबी समाजाचाही इशारा

“बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख”

“बाळासाहेब ठाकरेंनी हेही सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहा. त्यावेळी मी म्हटलं होतं की मनपाने परवानगी दिली तर ठीक आहे, नाही तर न्यायालयात जाऊन परवानगी घ्यावी लागेल,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“निकालाने शिवसैनिकांच्या मनातही उत्साह संचारला”

“देशात कुठेच न्याय मिळाला नाही, तर शेवटी आपण न्यायालयात जातो. न्याय व्यवस्था न्याय देते. अशाप्रकारे शिवसेनेला न्याय मिळाला आहे. त्याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो. निरपेक्ष पद्धतीने हा न्याय मिळाला आहे. या निकालाने शिवसैनिकांच्या मनातही उत्साह संचारला असेल,” असंही पवारांनी नमूद केलं.

“”आता ज्यांना एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी…”

अजित पवार पुढे म्हणाले, “आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी बीकेसीला जा. ज्यांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी शिवाजी पार्कवर जा.”

हेही वाचा : “आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही, अन् तुम्ही…”, संजय राऊतांचं नाव घेत राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा

“मला फक्त काळजी माध्यमांची आहे”

“मला फक्त काळजी माध्यमांची आहे. एकाचवेळी सभा सुरू झाली तर अर्धे इकडे, अर्धे तिकडे होऊन कुणाला दाखवायचं हा प्रश्न येईल. अर्थात माध्यमं त्यात तरबेज आहेत. आम्ही कालही बघितलं. दिल्लीची सभा दाखवायची की इकडची सभा दाखवायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यातून माध्यमं मार्ग काढू शकतात,” असंही पवारांनी म्हटलं.