राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांचं कौतुक करताना भाजपा नेत्याचा उल्लेख करत राजकीय नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. ते शनिवारी (२४ डिसेंबर) अमरावतीत राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “आम्ही लोकं राजकीय क्षेत्रातील आहोत. मी आणि आमदार प्रवीण पोटे वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. तेव्हा सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी एक गाणं म्हणून दाखवलं. तसेच त्यांची चित्रफितही दाखवली. त्यावेळी प्रवीण पोटेंना कळलं की, एवढं लोकप्रिय गाणं साधना सरगम यांनी गायलं. ते मला विचारलं की, हे त्यांनी म्हटलंय का?”

“आम्ही नुसती गाणी ऐकतो. कोणी गायलं काही घेणंदेणं नाही”

“आम्ही नुसती गाणी ऐकतो. कोणी गायलं, काय गायलं काही घेणंदेणं नाही. कानाला चांगलं वाटलं की ऐकायचं. परंतू सगळेच तसे नसतात. आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका साधना सरगम यांनी दोन दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या गोड, सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः भूरळ घातली,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवारांच्या या मिश्किल टिपण्णीनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. साधना सरगम यांनीही हात जोडून त्यांच्या कौतुकाला प्रतिसाद दिला.

व्हिडीओ पाहा :

“लता मंगेशकरांच्या काळातही साधना सरगमांनी बॉलिवूडवर भूरळ घातली”

अजित पवार पुढे म्हणाले, “गाणसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींच्या काळात बॉलिवूडवर दोन दशकं भूरळ घालण्याचं काम साधंसोपं नव्हतं. कारण या दोघी बहिणींसमोर कोणालाही उभं केलं तर लोक ते मान्य करतील की नाही असं प्रत्येक संगीतकाराला वाटायचं. परंतु, आमच्या महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्य असणाऱ्या रत्नागिरीत जन्माला आलेल्या आमच्या भगिनीने अशा पद्धतीने सुंदर प्रकारची गाणी गायली.”

“आजही साधना सरगम यांची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात”

“आजही साधना सरगम यांची गाणी पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा ऐकली तरी पुन्हा ऐकावीशी वाटतात. ‘जो जिता वही सिकंदर’मधील ‘पहिला नशा’ हे गाणं पाहिलं, जालबाजमधील डिंपल कपाडियावर चित्रित करण्यात आलेलं ‘हर किसी को नही मिलता प्यार जिंदगी में’ गाणं अतिशय सुंदर गायलं आहे. विश्वात्मामधील सात समुंदर मैं तेरे पिछे पिछे आ गयी हे गाणंही तुम्ही पाहिलं. ‘दिवाना’मधील ‘तेरी उम्मीद, तेरा इंतजार’ गाणंही मधुर आहे,” असं अजित पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : VIDEO: “मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी”, वक्तव्यावरील वादावर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवार इतका कडक असतानाही त्याला किती गाणी माहिती आहे”

“तुम्ही बघा, अजित पवार इतका कडक असतानाही त्याला किती गाणी माहिती आहे. माझं दुसरं अंग तुम्हाला माहिती नाही. तुम्ही माझं एकच अंग बघता आणि मला टोचत असता,” असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर ते म्हणाले, “गंमतीचा भाग जाऊ द्या, पण आई वडिलांच्या आयुष्यात जन्माला आल्यावर तुमचं माझं जग खूप सुंदर आहे. त्याचा कसा आनंद घ्यायचा हे प्रत्येकावर अवलंबून असतं.”