Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी जनसन्मान यात्रा काढून विधानसभेसाठी प्रचाराचा नारळ फोडला आहे. अशात त्यांच्या कार, जॅकेट यांचा रंग गुलाबी आहे. त्याचं नेमकं कारण काय? हे दस्तुरखुद्द अजित पवार ( Ajit Pawar ) यांनीच सांगितलं आहे. ANI या वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे कारण स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांसह जाणार का?

शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? असा प्रश्न अजित पवार ( Ajit Pawar ) यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी फक्त दोन शब्दांत दिलं. अजित पवार म्हणाले, “नो कमेंट्स.”, असं फक्त दोन शब्दांमध्ये उत्तर देत अजित पवार यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.

What Ajit Pawar Said About CM Post ?
Ajit Pawar : ‘सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार?’, अजित पवार म्हणाले, “मी आज…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Supriya Sule and Ajit Pawar
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, “त्या दिवशी…”
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांचं फक्त दोन शब्दांत उत्तर; म्हणाले…
eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Ajit Pawar on Supriya Sule vs Sunetra Pawar in Lok Sabha Election 2024
Ajit Pawar on Supriya Sule : अजित पवारांना चूक मान्य, “सुप्रियाविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, कारण…”

हे पण वाचा- Ajit Pawar : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांचं फक्त दोन शब्दांत उत्तर; म्हणाले…

गुलाबी रंग का निवडला?

जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगच का? असं विचारलं असता अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, “मला गुलाबी रंग आवडला म्हणून आम्ही निवडला. अमुक एक रंग निवडला म्हणून जर मतं मिळाली असती तर रोज वेगवेगळे रंग निवडले असते. पुरुषांना काय आवडतं? तो रंग वापरु वगैरे असं निवडलं असतं. आम्ही एक थीम निवडली आहे त्या अंतर्गत गुलाबी रंग निवडलाय इतकंच कारण आहे. आमच्या मनात रंग आला त्यामुळे नाही. आता या रंगाची चर्चा होते. अजित पवार या कलरचं जॅकेट का होतं? चर्चा होते. जांभळ्याच्या आतला जो रंग असतो तो रंग आम्ही घेतला आहे.”

गुलाबी रंग निवडून आम्ही काही स्ट्रॅटेजी आखलेली नाही

गुलाबी रंग निवडून आम्ही काही स्ट्रॅटेजी वगैरे आखलेली नाही. चंद्राबाबू नायडूंना पिवळा रंग आवडतो त्यांनी तो घेतला आहे. मला हा आवडला मी हा निवडला आहे. हा रंग महिला मतदारांना आकर्षित वगैरे करण्यासाठी वगैरे मुळीच नाही. अजित पवारच्या मनात जे येतं तेच मी करतो. मी त्यानंतर विचार करत नाही. एखादं वक्तव्य केलं तरीही मी मागे हटत नाही. मी त्यावर ठाम राहतो त्यावरुन वाद झाला तरीही मी पर्वा करत नाही. असंही अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.

What Ajit Pawar Said About Pink Color ?
अजित पवार गुलाबी रंगाबाबत नेमकं काय म्हणाले आहेत? (फोटो सौजन्य-अजित पवार, फेसबुक पेज)

शरद पवारांवर बोलणार नाही

यानंतर स्मिता प्रकाश यांनी पहाटेचा शपथविधीही तुमच्या मनात होतं म्हणून केलात का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, “मी आता विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चाललो आहे. मी आता त्यावर उत्तर देऊन झालं आहे. २०१४ ला आम्ही पाहिलं की भाजपाला पाठिंबा राष्ट्रवादीने दिला होता. त्यावेळी आमच्या हातात काही होतं का? त्यानंतरही चर्चा झाल्या आहेत, भाजपासह जाण्याची चर्चा झाली आहे. आता शरद पवारांवर माझं एकच उत्तर नो कॉमेंट्स. शरद पवार आमचे प्रमुख होते, त्यानंतर आम्ही जेव्हा निर्णय घेतला, काही बोललो तर लोकांना आवडत नाही. शरद पवारांकडे वरिष्ठ नेते म्हणून महाराष्ट्र पाहतो. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की त्यांच्यावर बोलायचं नाही. त्यामुळे मी शरद पवारांवर बोलणार नाही.” असं अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंची राजकारणाची पद्धत वेगळी आहे

शरद पवारांची राजकारणाची पद्धत वेगळी आहे, सुप्रिया सुळेंची पद्धत वेगळी आहे. पंडीत नेहरुंची पद्धत वेगळी होती, इंदिरा गांधींची राजकीय पद्धत वेगळी होती. जुन्या पिढीतले लोक वेगळा विचार करतात, नव्या पिढीतले लोक नवा विचार करतात. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. असंही अजित पवार ( Ajit Pawar ) एका प्रश्नाच्या उत्तराबाबत म्हणाले.