हा काही राजकीय भूकंप आहे वगैरे मला वाटत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांनी शपथ घेतली ते आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की शिंदेंच्या फुटीर गटासंदर्भात जो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ते आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची सुरुवात आहे. त्यामुळे नवी टीम भाजपाने घेतली आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचा तिसरा अंक पाहण्यास मिळाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकार अस्थिर झाल्यानेच हे सगळं घडवून आणण्यात आलं आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

माझं शरद पवारांशी या विषयावर बोलणं झालं आहे. ते खंबीर आहेत, उद्धव ठाकरेंशीही चर्चा झाली आहे. शरद पवार, काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरे आम्ही खंबीरपणे उभे राहू. लोकांचा या सगळ्याला पाठिंबा नाही. आम्ही सगळे एकत्र राहू याबद्दल माझ्या मनात शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा शिंदे गटाचा होणार होता. अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बसून बसले होते. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा जो शपथविधीच्या वेळी सगळ्यांचे चेहरे पाहिले का? कोणताही कायदा आणि कोणतीही पळवाट शिंदे आणि त्यांच्यासहच्या गटाला अपात्र ठरवण्यापासून बोलत नाहीत. मी सांगतो आहे राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल हे माझं भाकीत नाही माझं परखड मत आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना सगळं प्रकरण माहित होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्यांना तुरुंगाचे दरवाजे उघडले होते त्यांना मंत्रिपद दिलं आहे आता भाजपा काय बोलणार? भाजपाचे पोपटलाल कुठे आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.