scorecardresearch

Premium

“आता तर कहर झाला”, अजित पवारांचा ‘त्या’ प्रकारावरून सरकारवर हल्लाबोल; विचारला ‘हा’ सवाल!

अजित पवार म्हणतात, “हे असं होत असताना स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत…!”

ajit pawar on eknath shinde devendra fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ‘इंडिक टेल्स’ या संकेतस्थळावर सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याची बाब सीपींच्या निदर्शनास आणून त्यावर कारवाईची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. छगन भुजबळ, अजित पवार आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला. तसेच, महाराष्ट्र सदनमधील प्रकाराबाबत जाब विचारला.

“पहिल्यापासून मी सांगतोय की महापुरुषांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या हल्ली वाढली आहे. आता तर कहर झाला. इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांनी वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. इतका की मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत गरळ ओकण्याचं काम केलं जातंय. याचा तपास केला पाहिजे. मी सीपींना हेच सांगितलं की इतरांच्या बाबतीत कुणाचं काही झालं, तर तुमची यंत्रणा लगेच कामाला लागते. पण हे त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

“यामागचा मास्टरमाईंड शोधा”

“सीपींनी वेळ मागितला आहे. त्या वेबसाईटवर हे लिखाण करण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं, यामागचा कोण मास्टरमाईंड आहे, हे शोधून काढण्याची आम्ही त्यांना विनंती केली आहे”, असंही ते म्हणाले.

“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणी लागू नका”, रोहित पवारांचा इशारा; राम शिंदेंवर टीकास्र!

“महापुरुषांचा होणारा अपमान बहुतेक ठिकाणी राज्यकर्तेच करत आहेत. त्यांचं काम आहे कायदा-सुव्यवस्था टिकवणं. मागच्या राज्यपालांनी ही सुरुवात केली. त्यानंतर आत्ताच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी त्यात भर घातली. विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी त्यात भर घातली. सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधींनी काही भर घातली. आम्ही त्याबद्दल मागे महाविकास आघाडीनं मोर्चा काढला. आत्ताच्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नांना महत्त्व देण्याऐवजी हे मुद्दे पुढे येतात. मग त्या मूळ प्रश्नांचं महत्त्व राहात नाही. त्यामुळे महापुरुषांच्या बाबतीत वाचाळवीरांनी बोलता कामा नये. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे. त्यातून सगळ्यांनाच संदेश गेला पाहिजे की आपण असं वक्तव्य करता कामा नये”, अशा शब्दांत अजित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

“मग हलवता कशाला पुतळा?”

“हे असं होत असताना स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतला एक कार्यक्रम दिल्लीत घेतला. छगन भुजबळांचं महाराष्ट्र सदन निर्मितीत मोठं योगदान आहे. योग्य जागा निवडून ते ते पुतळे तिथे बसवण्यात आले आहेत. अशा वेळी ते अर्धपुतळे बाजूले केले जात आहेत. नंतर सरकारकडून असं वक्तव्य करतात की आमचा त्यामागचा हेतू वेगळा होता, भावना दुखवायच्या नव्हत्या वगैरे. मग हलवला कशाला पुतळा?” असा सवाल अजित पवारांनी राज्य सरकारला केला आहे.

“भाजपाचा झेंडा मराठी माणसाचा नाही तर शेठजी, व्यापारी….” संजय राऊत यांची जहरी टीका

“संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा”

“जिन्याच्या दोन्ही बाजूला पुतळे होते. यांनी जिना चढून गेल्यावर १०-१५ फुटांवर वीर सावरकरांचं पोर्ट्रेट वगैरे ठेवलं होतं. नंतर ते काढलंय. प्रशासनाला हे माहिती आहे की महापुरुषांबद्दल असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर जनता खपवून घेत नाही. मग ज्या अधिकाऱ्यानं हे केलं, त्याचं नाव समोर आणा आणि त्याच्यावर कारवाई करा”, अशी मागणीही अजित पवारांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×