उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्मक्लेश म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर रविवारी दिवसभर उपोषण केल्यामुळे समाधी परिसर अपवित्र झाल्याची टीका करीत हा परिसर पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न सोमवारी भाजपा, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने आंदोलक कार्यकर्त्यांशी पोलिसांची चांगलीच झटापट झाली. दरम्यान, अजित पवारांना येथे येण्यापासून आम्ही रोखू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करताना, अजित पवारांच्या उपोषणामुळे समाधी परिसर अपवित्र झाला असून, तो पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न भाजपा, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. या वेळी विष्णू पाटसकर म्हणाले की, अजित पवारांनी आत्मक्लेश उपोषण करण्यापेक्षा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे वाचन केले असते तर अधिक उचित झाले असते.