अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेंमध्ये हनुमान चालीसावरुन सुरु झालेला वाद दिवसेंदिवस वाढत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे राणा दामपत्य चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एक संधी राणा दामपत्य सोडताना दिसत नाहीत. जळगावात नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर ऐकेरी भाषा वापरत टीका केली आहे.

हेही वाचा- भाजपाचं ठरलं, “२०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार!

उद्धव ठाकरेंवर टीका

“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे”, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

हेही वाचा- “मी काय अंगठाछाप मंत्री, वेडा वाटलो का?,” हाफकिनसंबंधी ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारताच तानाजी सावंत संतापले, नेमकं काय घडलंय?

काय म्हणाल्या नवनीत राणा</strong>

“उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला. तरुंगामधून निघाल्यावर त्यांना वाटलं मी तुटून जाईल. तिला काही बोलता येणार नाही. ती आमच्याविषयी काही बोलणार नाही. पण ज्या दिवशी तरुंगामधून बाहेर पडले. तेव्हा माझ्यात जास्त ताकद आली होती. चौदा दिवस, बारा-बारा तास मी तरुंगात मी हनुमान चालिसेचं पठण केलंय. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट मी हनुमान चालिसेमध्ये मी पाठ करत होते. जर माझ्या भक्तीत थोडीही ताकद असेल, तर हनुमंत राय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवेल. आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही”, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.