महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत गाणं गायलं आहे. त्यांचं हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आलं आहे.

ट्रोलिंगच्या प्रकारानंतर अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्रोल करणारी लोक विरोधी पक्षातील असल्याचं सांगत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत, त्यांच्यावर बोलण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही, त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात, असं विधान अमृता फडणवीसांनी केलं. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- “त्यांच्यावर अन्याय होतोय, हे…”, पंकजा मुंडेंना शिवसेनेत घेण्याबाबत ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही किंवा त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधक तेच करत आहेत. त्यांनी माझ्या या गाण्यालाही सोडलं नाही, ते ठीक आहे. पण त्यांनी माझ्या भजनालाही ट्रोल केलं. देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय पदामुळे हे केलं जातंय, हे मला माहीत आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे. मी सातत्याने माझं काम करत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या गाण्याला लोकांची पसंतीही वाढत आहे,” असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना अंधारेबाईच्या पदराचा…”, बाळासाहेबांना काय वाटत असेल म्हणत रामदास कदमांची जोरदार टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्त्री ही एक शक्ती आहे आणि स्त्री शक्तीसाठी लवकरच माझं नवीन गाणं येत आहे. ते गाणं मी म्हणणार आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे गाणं मी प्रदर्शित करणार आहे”, अशी माहितीही अमृता फडणवीसांनी दिली.