बुधवारी मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ”ही निवडणूक फडणवीसांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असेल”, अशी टीका केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नागपुरातील लाईफ स्किल फाऊंडेशन आणि रक्षणम अकॅडमीद्वारा आयोजित कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

हेही वाचा – कोणत्या युक्तिवादाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली? वाचा…

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा येतात. कोणी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तरी ते पुन्हा येतात. ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची युएसपी आहे. तसेच पुन्हा चांगल्यासाठी येतात, ही चांगली गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या शेवटची निवडणूक लढवण्याच्या केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, त्या म्हणाल्या “उद्धव ठाकरे प्रत्येक बाबतीत कुरकूर करतात, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक बातमी मी बोलू शकत नाही”

हेही वाचा – दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर आदित्य ठाकरेंची चार ओळीत प्रतिक्रिया, म्हणाले, “विजयदशमी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तरुणांनी सैन्यात जाणं ही गर्वाची बाब आहे. मात्र, सैन्यात भरती होणाऱ्यांना किती इन्सेटीव्ह मिळतो, काय सुविधा मिळतात, त्यांची लाईफस्टाईल नेमकी कशी असत, याबाबत आपल्या नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे याची प्रत्येकाने माहिती घ्यावी”, असेही त्या म्हणाल्या.