नगर: महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेतला, या निर्णयाला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी  १४ पासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बरबादीकडे जाणारी युवाशक्ती व संस्कृतीची होणारी अधोगती पाहायला लागू नये, यासाठीच आपण बेमुदत उपोषण करत असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यानंतर निर्णय मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. परंतु सरकारने त्यांच्या पत्राला प्रतिसाद न दिल्याने अखेर हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय जाहीर केला.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

हजारे यांनी पत्रात म्हटले की, केवळ वाढणारा महसूल व वाईन उत्पादक आणि विक्रेत्यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसते. परंतु लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येतो हेही आश्चर्यकारक आहे.