ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च करण्यात आला, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या याच आरोपाला ठाकरे गटातील नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, अशी खोचक टीका केसरकर यांनी केली आहे. केसरकरांच्या याच विधानारवर आता ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा धारण करत चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे, तो बघायला हवा, अशी खोचक टीका केली आहे. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा नवा दावा; म्हणाले, “माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे, कारण…”!

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आदित्य ठाकरे यांनी युवा चळवळीत काम केलेले आहे

“दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या अनुभवाविषयी वक्तव्य करताना त्यांच्या दिव्याखाली जो अंधार आहे, तो बघायला हवा होता. त्यांच्यासोबत असणाऱ्या कित्येक आमदारांची, खासदारांची मुलं काय करत आहेत, ते पाहावे. ते अल्पवयात, काहीही अनुभव नसताना थेट आमदार, खासदार झाले आहेत. त्यांनी पक्षात कधीही काम केलेले नाही. आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत हे उलटे आहे. आदित्य ठाकरे यांनी पक्षात काम केलेले आहे. आदित्य ठाकरे यांनी युवा चळवळीत काम केलेले आहे. त्यांनी युवकांचे प्रश्न सोडलवलेले आहेत,” असे प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दीपक केसरकरांना दिले.

हेही वाचा>>> “आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद, उद्धव साहेबांनी आता…”; डाव्होस दौऱ्यावरून झालेल्या आरोपाला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडेही नाही

“आदित्य ठाकरे यांनी राज्य प्लास्टिककमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारला प्लास्टिक मुक्ताची कायदा आणायला लावला होता, हे विसरून चालणार नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडेही नाही. त्यामुळे प्रगल्भता असलेली मुलं जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी ज्येष्ठांनी उभे राहायला हवे,” असेही सावंत म्हणाले.

याचाच अर्थात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व समर्थ

“आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर ते देत नाहीयेत. याचाच अर्थात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व समर्थ आहे. त्यांचा अभ्यास जबरदस्त आहे. त्यांनी राज्याला एक दिशा दाखवलेली आहे. आज मुंबईचे सुशोभिकरण केले जात आहे, त्याचा पाया आदित्य ठाकरे यांनीच रचलेला आहे. कसे चांगले काम करावे, हे आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिले आहे,” असेही अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा>>> ‘ठाकरे गट MIM शी युती करू शकतो’ म्हणणाऱ्या बावनकुळेंवर अंबादास दानवेंचे टीकास्र; म्हणाले, “तुम्ही आमच्या…”

दीपक केसरकर काय म्हणाले?

“आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी. जगभरातील लोक डाव्होसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं. डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होस पोहोचण्यात उशीर झाला. डाव्हासमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणं, हे योग्य नव्हतं. हा पंतप्रधानांचा अपमान ठरला असता,” असे दीपक केसरकर म्हणाले.