scorecardresearch

शिवसैनिकाकडून केसरकर यांच्या निवासस्थानावर दगडफेक करण्याचा प्रयत्न

आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशी घोषणा देत एका शिवसैनिकांने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी — कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रय केला.

depak kesarkar house
दगडफेक करून पळून जाणारम्य़ा एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले.

सावंतवाडी : आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशी घोषणा देत एका शिवसैनिकांने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी — कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. दंगल पथक तैनात असताना दगडफेक करून पळून जाणारम्य़ा एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले.तो स्थानिक नसून कणकवलीचा असल्याचा पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी संशय व्यक्त केला आहे.

 शिवसेनेशी फारकत घेवून एकनाथ शिंदे गटाशी संधान साधणार्?या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकांकडुन दगड फेक करण्यात आली. यावेळी “आवाज कुणाचाङ्घ? शिवसेनेचा.! अशा घोषणा त्या कार्यकत्याकडुन देण्यात आल्या. अचानक झालेली दगड फेक लक्षात घेता त्या ठिकाणी असलेल्या दंगल नियंत्रण पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही घटना आज शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली.

आमदार दीपक केसरकर यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेने सोमवारी निर्णय घेण्याचे ठरविले आहे. तसेच दहशत म्हणून ओरडून सांगण्यात ते माहीर आहेत त्यामुळे सावंतवाडी शिवसेना शांत आहे.  मात्र एका शिवसैनिकांने वातावरण निर्माण करण्याचा प्रय केला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर कोरे म्हणाले, एका व्यक्तीने दगडफेक करण्याचा प्रय केला. त्याला ताब्यात घेतले आहे. तो स्थानिक नसून कणकवलीचा असल्याचा संशय आहे. तो नशेत होता किंवा कसे तेही तपासले जात आहे. तो शिवसैनिक आहे का? ही चौकशी केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempt shiv sainiks to throw stones at kesarkar residence ysh