राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०१४ पासून देशात लोकशाही, राज्यघटना आणि पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होत आहे, हे काळजी करायला लावणारं आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता पाहात आहे . याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेसाठी दुर्दैवी आहे, अशी खंत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. राज्यातील जनता महाविकास आघाडीबरोबर असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले की, आजची शपथविधीची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटनेसाठी दुर्दैवाची आहे . पुढील काळात देश कसा चालेल? हे काळजी वाटण्यासारखी आहे. पक्ष, पद्धत, विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे, असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल.

हेही वाचा- अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; शरद पवारांचा VIDEO ट्वीट करत म्हणाल्या…

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पाहत आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालयात जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे. जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहेत, असंही थोरात म्हणाले.

हेही वाचा- “बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधलाय, येत्या दोन दिवसांत…”, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान

बाळासाहेब थोरातांनी पुढे नमूद केलं की, राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभेला ३८ आणि विधानसभेला १८० जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सव्हेंनी वर्तवला आहे. त्यामुळे भाजपा अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी आणि टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्तेबरोबर गेले, हे नक्कीच काळजी वाटणारं आहे.