काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या विदारक वास्तव जीवनाचे जिवंत चित्रण असलेली कादंबरीकार डॉ. सदानंद देशमुख यांची साहित्य अकादमी पुरस्कार विजेती ‘बारोमास’ ही कादंबरी आता इंग्रजी व हिंदी या भाषांमधून उपलब्ध झाली आहे.
सुप्रसिद्ध पॉप्युलर प्रकाशनने इंग्रजीतील ‘बारोमास’ उपलब्ध करून दिली असून तिचा सशक्त इंग्रजी भाषानुवाद डॉ. विलास साळुंखे यांनी केला आहे. हिंदीतील अनुवाद डॉ. दामोदर खडसे यांनी केला असून साहित्य अकादमीच्या वतीने ती प्रकाशित क रण्यात आली आहे.
मराठी भाषेतील बारोमासला साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले आहेत. शेतकरी जीवनपद्धतीचे भीषण वास्तव आता हिंदीद्वारे देशभर व इंग्रजीद्वारे सातासमुद्रापलीकडे पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाची भयानकता आता विश्वव्यापी होणार असून संपूर्ण जगाने भारतीय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यावे, अशी साद त्याद्वारे घातली जाणार आहे. ‘बारोमास’ आधारित धीरज मेश्राम दिग्दर्शित ‘बारोमास’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
डॉ. सदानंद देशमुख हे विदर्भाच्या काळ्या कसदार मातीत पाय घट्ट रोवून असलेले प्रतिभावंत साहित्यिक असून त्यांची प्रत्येक साहित्यकृती वास्तवाचे धगधगतेपण उजागर करते. त्यांच्या ‘खुंदळघास’ व ‘गाभुळगाभा’ या गाजलेल्या कथासंग्रहानंतर पॉप्युलर त्यांची ‘चारीमेरा’ नावाची कादंबरी प्रकाशित करीत आहे.

amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?