पाचगणीतल्या टेबललँड पॉईंटवर १५ ते २० पर्यटकांवर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आगे मोहळच्या मधमाशांनी हल्ला चढवला आणि दंश केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. पर्यटकांवर मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पहिली वेळ नाही. तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सुमारे ५० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला करून त्यांना दंश केला. या घटनेमुळे टेबललँडवर फिरकणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावते आहे.

मधमाश्यांच्या हल्याने पर्यटक व व्यावसायिक हादरले असून टेबललँड परिसरातील मधाचे पोळे हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मधमाश्यांच्या हल्याचा स्थानिक व्यवसायिकांवर परिणाम होत असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सुरक्षाविषयक उपायांचा विचार करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. पर्यटन हंगाम जवळ आल्याने अशी घटना नव्याने घडू नये यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात टेबललँड पॉईंट भयमुक्त करावा. नव्याने चालू होणाऱ्या पर्यटन हंगामातील येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षा संदर्भात आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.