शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे जळगामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत, असा इशारा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

गुलाबरावांच्या वक्तव्याबाबत शिंदे गटाचे आमदार म्हणाले की, भरत गोगावले म्हणाले की, राजकारणात आव्हान प्रतिआव्हान करावंच लागतं. त्याशिवाय जनतेला पण समजत नाही. नाहीतर आम्ही गप्प बसलोय असं त्यांना वाटेल. आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत. म्हणजे संजय राऊत एकटाच हिरो आम्ही काय झिरो आहोत काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुलाबरावांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, त्यांनी फेकावा दगड आणि त्या दगडासहित घरी जावं. या पलिकडे मी यावर काहीच बोलणार नाही. उद्धव ठाकरे यांची आज (२३ एप्रिल) पाचोऱ्यात मोठी सभा होईल. ही सभा पाहून गुलाबराव पाटलांचे डोळे बंद होतील. आजच्या सभेला जमलेली आलोट गर्दी पाहून गुलाबचा गुलाब फुलणार की नाही याची भिती गुलाबरावांना आहे. त्यामुळे हा त्यांचा त्रागा सुरू आहे