भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव, तर ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. पक्षाला नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालेले असले तरी, अद्याप ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेल्या मशाला या चिन्हावर आता समता पार्टीने दावा केला आहे. समता पार्टीच्या याच दाव्यावर आता उद्धव ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला हे निवडणूक चिन्ह भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे समता पक्षाचा काही आक्षेप असेल, तर तो त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडेच नोंदवावा, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी घेतली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>>> “…म्हणून भाजपानं शिवसेना फोडली” जयंत पाटलांचं स्पष्ट विधान, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचाही केला उल्लेख

rajnath singh modi shah
२०२५ मध्ये अमित शाह पंतप्रधान होणार? अरविंद केजरीवालांच्या दाव्यावर राजनाथ सिंहांचं उत्तर; मोदींच्या निवृत्तीबाबत म्हणाले…
narendra modi
“नकली शिवसेनेत हिंमत असेल तर काँग्रेसच्या युवराजांकडून…”, कल्याणमधील सभेतून पंतप्रधान मोदींचं ठाकरे गटाला आव्हान
Raj Thackeray
“राज ठाकरे भाजपाचं स्क्रिप्ट वाचतात, करमणुकीसाठी निवडणुकीआधी इव्हेंट…”, काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
What Narendra modi said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
Mahadev Jankar
“भावी मंत्री म्हणून बोलतोय, निवडणुकीच्या निकालानंतर मी…”, महादेव जानकरांचं बारामतीकरांसमोर वक्तव्य
Govinda eknath shinde
राजकारणातील पुनरागमनासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचीच निवड का केली? अभिनेता गोविंदा म्हणाला…
Kolhapur, Modi, Congress,
कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
bjp leaders goal to get 370 seats in lok sabha poll
३७० जागा मिळाव्यात, असे भाजपनेत्यांना तरी का वाटावे?

१९९४ सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पक्षाने केला आहे. त्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मशाल या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात आहे. याबाबतची प्रत्यक्ष माहिती माझ्याकडे नाही. मात्र हे चिन्ह आम्ही स्व:त घेतलेले नाही. भारतीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे त्यांना काही तक्रार, दावा, मागणी करायची असेल, तर ती भारतीय निवडणूक आयोगाकडे करावी,” असा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला.

हेही वाचा >>>> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”

“आमच्या चिन्हाबदल जो आक्षेप घेतला जात आहे, त्याला आमची कायदेशीर बाजू सांभाळणारे पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई भूमिका घेतील,” असेही सुभाष देसाई यांनी स्पष्टपण सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

समता पार्टीने उद्धव गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर दावासांगितला आहे. १९९४ सालापासून हे राष्ट्रीयकृत चिन्ह आमच्या पक्षाचं असल्याचा दावा पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या तृणेश देवळेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. यासंदर्भात पक्षाने निवडणूक आयोगाला ईमेलच्या माध्यमातून माहिती कळवली असून हे चिन्ह आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर या चिन्हासाठी थेट न्यायालयामध्ये जाण्याचा इशाराही समता पार्टीने दिला आहे.