पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा प्रचंड आक्रमक झाली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसऱ्या घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली.

यानंतर चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका केली. “महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- “संजय राठोड मिस्टर इंडिया झालेत, कुणालाच दिसेनात!”

पोलीस रक्षक आहेत की भक्षक आहेत अशी विचारणा करताना चित्रा वाघ यांनी नक्कीच यांच्यावर दबाव आहे असा आरोप केला. “पोलीस आमच्याकडे तक्रार नाही असं सांगत आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. यांच्याकडून तपास काढून घेतला पाहिजे. ते राजकीय दबाबाखाली काम करत आहेत. मी माझ्या २२ ते २४ वर्षाच्या समाजकारणात हे पाहिलेलं नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुओ मोटो अंतर्गत तक्रार का दाखल केली नाही असं मी विचारलं असता लेखी परवानगी नसल्याचं सांगत आहेत. कोणाची चाकरी करत आहात ? आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही असं ते वागत आहेत. नक्की कोणाची परवानगी हवी आहे हे स्पष्ट करावं,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी केली.