सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला मारहाण करण्याचा धमकीवजा इशाराही दिला होता. यावर उर्फीनेही ट्वीट करतही चित्रा वाघ यांना जशास तसं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा- “उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही,”अमृता फडणवीसांचं विधान

हा वाद सुरू असतानाच महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. दोन समुदायात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महिला आयोगाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत महिला आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत महिला आयोगाला प्रत्युत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय, याचं आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीस पाठवण्याचा, तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर पडलीय. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरत आहे, तिला नोटीस द्यायला हवी… तर तिला नोटीस न देता… हा नंगानाच होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारीला नोटीस पाठवली आहे. असो… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार…”