सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आठ विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून ५८ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. निवडणुकीसाठी तयारी म्हणून भाजपा प्रदेश कार्यालयाकडून आमदार अनिल सोले यांना सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी नियुक्त केले होते. यामध्ये गाठीभेटी घेऊन इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेणे. मतदारसंघात त्यांनी केलेली कामे, मतदारसंघातील समस्या आणि उमेदवारी मागण्याचे कारण याची माहिती घेतली.

सुरुवातीला निवड समितीची बैठक झाली. कमिटी सदस्यांकडून मतदारसंघाप्रमाणे शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, गट, गण, प्रभाग या सर्वांची माहिती त्यांनी घेतली. यानंतर मतदारसंघ निहाय निरीक्षक आमदार अनिल सोले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुलाखती घेतल्या.

“सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी गर्दी केली होती. एकूण ५८ जणांनी मुलाखती दिल्या. यावेळी इच्छुक महिलांची उपस्थिती लक्षणीय होती,” असं भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितलं. “आमदार जयकुमार गोरे हे प्रवेश आणि वरिष्ठांना भेटण्याच्या गडबडीत होते, त्यामुळे उमेदवारी मुलाखतीच्यावेळी गैरहजर होते. यावेळी त्यांच्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे,” अशी माहिती विक्रम पावसकर यांनी दिली.

इच्छुकांची यादी –
कोरेगाव मतदार संघ- महेश शिंदे,संतोष जाधव,
विवेक कदम,रणजित फाळके,प्रभाकर साबळे,रमेश माने, सुवर्णा राजे.
कराड उत्तर- मनोज घोरपडे,रामकृष्ण वेताळ,सयाजीराव पाटील,विश्वास सावंत,हिंदुराव चव्हाण,रामचंद्र चव्हाण,सागर शिवदास,
सातारा जावळी-शिवेंद्रसिंहराजे भोसले,
दीपक पवार,अमित कदम,संतोष जाधव,अभय पवार, स्मिता निकम,सुनिशा शहा
वाई- मदन भोसले,चंद्रकांत उर्फ सी व्ही काळे,मोनिका धायगुडे,अविनाश फरांदे,प्रशांत जगताप,रामदास शिंदे, दीपक जाधव,सचिन घाडगे,प्रदीप क्षीरसागर,शैलेंद्र वीर,दिनकर शिंदे,
माण खटाव-डॉ दिलीप येळगावकर,बाळासाहेब मासाळ,अनिल देसाई,सचिन गुदगे,महादेव कापसे
पाटण -भरत पाटील,कविता कचरे,सुरेखा तुपे,नानासो सावंत,रामचंद्र लाहोटी,दीपक महाडिक,सागर माने, नितीन जाधव
कराड दक्षिण- जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर ,डॉ अतुल भोसले
फलटण- स्वप्नाली शिंदे,रावसाहेब क्षीरसागर,मिलिंद काकडे,शैलेंद्र कांबळे,सुधीर अडागळे,राजेंद्र काकडे, नयना भगत,राज सोनावले,विश्वनाथ शिंदे,वसंत निकाळजे,संदीप शिंदे