शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत लाभार्थ्यांना उत्तर द्यावंचं लागेल असं म्हटलं आहे.
ईडीच्या नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते एचडीआयएल (वाधवान बंधू), एचडीआयएल ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत…गेल्या काही महिन्यात ईडीकडून तीन नोटीस…पण उत्तर नाही…का? लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल”.
Senior Citizens Depositors
to #PMCBank
to #HDIL (Wadhwan Brothers)
to
Praveen Raut
to
Madhuri Pravin Raut
to
Varsha/ #SanjayRaut
1st Notice, 2nd Notice, 3rd Notice of ED in last few months, than also No Response!
Why?
Beneficiary ne Hisab to Dena Padega
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 28, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.
आणखी वाचा- वर्षा राऊत यांना पाठवलेल्या ईडी नोटीशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
ईडी नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला.
“हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
आणखी वाचा- शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?; राष्ट्रवादीचा सवाल
नवाब मलिकांची टीका
राजकीय सूडभावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांकडे पोहोचवली जाते. त्यामुळे नेत्यांची उगाच बदनामी करायची हा हेतून आह की काय अशी शंका येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.