पुढील काळात भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील, असे स्पष्ट करीत नड्डा यांनी भाजप कोणत्याही पक्षाशी राज्यात युती करणार नाही, असे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्य समिती व पदाधिकारी बैठकीत बोलताना नड्डा यांनी भाजप व अन्य पक्षांमधील कामकाज पद्धतीतील फरक विशद केला. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांना पदे मिळत नाहीत, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करून मिळतात, असे सांगितले.

आणखी वाचा- अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील; काँग्रेसचं रावसाहेब दानवेंना उत्तर

स्वामिनाथन समितीच्या शिफारशींबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी धैर्य दाखवून निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांना निर्बंधांमधून मुक्त केले, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader jp nadda fight in maharashtra election alone no alliance will be done in future jud
First published on: 09-10-2020 at 07:59 IST