राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघाची निवडणूक खास गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाऊ-बहिणींमध्ये या मतदारसंघात काटें की टक्कर पहायला मिळाली. मात्र धनंजय मुंडे यांनी विजय मिळवत आपल्या बहिणीला पराभूत केलं. पंकजा यांचा पराभव कसा झाला यावर त्यानंतर बरीच चर्चा झाली, अनेकांनी या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आता पाच महिन्यानंतर पंकजा यांनीच आपल्या पराभव का झाला याचे उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा यांनी त्यांच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाची आठवण करुन दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आई तू इतकी चांगली आहेस मग तू जिंकली का नाहीस?, असा प्रश्न माझ्या पराभवानंतर माझ्या मुलानं मला विचारला. तू तुझा पेपर लिहितो म्हणून तुला सांगता येतं की इतके मार्क आहेत. आमच्याकडे मात्र मी अभ्यास करते आणि पेपर दुसरेच लिहितात त्यामुळेच मी पराभूत झाल्याची शक्यता आहे,” असं पंकजा यांनी सांगितलं. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभाच्या प्रसंगी पंकजा बोलत होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde talks about her defeat scsg
First published on: 10-03-2020 at 09:05 IST